...तो...

‘तो’ ..आणि त्याच्या अपयशाचे प्रतिक असलेले ते ‘नापास’ चे प्रमाणपत्र तो घराकडे निघाला. डोळ्यात अश्रू, घरी काय तोंड दाखवायचे? या विवंचनेत असलेले मन , भूतकाळाचा सारीपाठ आठवत स्वत:स दोष देत संताप व्यक्त करणारा मेंदू आणि त्यात उद्भवलेले नको नको त्या विचारांचे ओझे घेऊन तो घराची वाटे ने निघाला.वरकरणी शांत पण आतून उध्वस्त होऊन दिशाहीन गलबताप्रमाणे तो एकएक पाउल संथपणे टाकीत गल्लीत येऊन पोहोचला. घरामध्ये शिरताच त्याने सरळ माजघर गाठले. घरातील सर्व साशंक नजरेने त्याच्या कडे पाहत होते. आणि.. सातत्याने प्रयत्न करून देखील अपयश त्याची पाठ सोडीत नव्हते. सागेसोयाऱ्यानी देखील वाया गेलेलं पोर म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आणि तो देखील स्वत:स तसेच समजायला लागला. गरुडझेपेची स्वप्न पाहणारा तो’ कोंबड्या साठी टाकलेले दाणे टिपू लागला. उध्वस्त झालेल्या मुलाकडे बघून कळवळणरा माय-बापांचा जीव तीळ तीळ तुटत होता आणि त्यांनी घेतला एक निर्णय पुन्हा एकदा त्याला संधी देण्याचा, आणि... ...