Posts

Showing posts from October, 2016
उद्धट . संध्याकाळी ६ वाजेची डि एस के ला जाणारी बस शक्यतो भरगच्चं भरलेली असते. कॉलेज,क्लास, जॉब आटपून थकलेल्या जीवांची बस मध्ये जागा मिळवण्यासाठी ची धडपड चाललेली असते. तसं तर गाडी घेतल्या पासून माझं PMT ने जाणं बहुदा दुरापास्तच झालंय पण त्या दिवशी बऱ्याच काळानं PMT ने प्रवास करण्याचा योग आला. सारसबागेच्या बसस्टॉप गर्दीमध्ये वाट काढीत मी बस मध्ये चढलो, चढलो म्हणण्यापेक्षा गर्दीनेच मला चढवलं व एका जख्ख म्हाताऱ्या आजोबांजवळ उभं राहण्याची जागा मला मिळाली. आमच्या जवळच्या सीट वर ऐन १८-१९ वर्षाचा कॉलेजकुमार हेडफोन कानात टाकून छान पैकी गाणे ऐकत बसलेला होता. तुडुंब भरलेल्या बस मध्ये वाट काढीत कंडक्टर आमच्या पर्यंत येऊन तिकीट काढून पुढे केव्हा गेला याच मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. कंडक्टर च्या या गरबडीत शेजारी उभ्या असलेल्या आजोबांचा धक्का तेथे बसलेल्या 'कानसेन' तरुणास लागला व त्याची श्रवणसमाधी भंग पावली. आपल्याहून किती तरी वर्ष मोठ्या असलेल्या आजोबांना उभे असलेले बघताच त्या तरुणाने स्वतः ची जागा त्या आजोबांना देत त्यांचा मणभर आशीर्वाद मिळवला. उभा राहिलेला तो तरुण हळू...