सर्जिकल स्ट्राईक २.०

सर्जिकल स्ट्राईक २.० भारतीय लष्कराच्या पाकव्याप्त काश्मीर मधील सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतीय रिझर्व्ह बँक व अर्थमंत्रालयाने आर्थिक सर्जिकल स्ट्राईक करीत नुकतीच एक मोठी कामगिरी पार पाडली. वास्तविक चलनी नोटांमध्ये दर दहा वर्षांनी बदल करीत रहावे असे थोर "अर्थतज्ञ" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या "The problem of the rupee:Its origin and its solution" या ग्रंथात नमूद केलेले आहे.( 1923 साली त्यांच्या "डाॅक्टर आॅफ सायन्स" ह्या पदवी साठी "लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स" ह्या विद्यापीठ मध्ये हा प्रबंध मांडला गेला) ५०० व १००० च्या नोटा रद्द करीत विद्यमान सरकार ने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसून येते. पाकिस्तान च्या इकोनॉमिकल प्रॉक्सी वॉर पासून बचाव. भारताची गुप्तचर संस्था "रिचर्स अनॅलिसीस विंग" (RAW) ने सरकार ला दिलेल्या माहिती नुसार "पाकिस्तान मध्ये पेशावर येथे बनावट भारतीय नोटा छापणारी टांकसाळ असून तेथे बहुतांशी ५०० व १००० रुपयांच्या च्या भारतीय नोटा छापल्या जातात. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI हि टांकसाळ...