सर्जिकल स्ट्राईक २.०
सर्जिकल स्ट्राईक २.०
वास्तविक चलनी नोटांमध्ये दर दहा वर्षांनी बदल करीत रहावे असे थोर "अर्थतज्ञ" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या "The problem of the rupee:Its origin and its solution" या ग्रंथात नमूद केलेले आहे.( 1923 साली त्यांच्या "डाॅक्टर आॅफ सायन्स" ह्या पदवी साठी "लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स" ह्या विद्यापीठ मध्ये हा प्रबंध मांडला गेला)
५०० व १००० च्या नोटा रद्द करीत विद्यमान सरकार ने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसून येते.
पाकिस्तान च्या इकोनॉमिकल प्रॉक्सी वॉर पासून बचाव.
भारताची गुप्तचर संस्था "रिचर्स अनॅलिसीस विंग" (RAW) ने सरकार ला दिलेल्या माहिती नुसार "पाकिस्तान मध्ये पेशावर येथे बनावट भारतीय नोटा छापणारी टांकसाळ असून तेथे बहुतांशी ५०० व १००० रुपयांच्या च्या भारतीय नोटा छापल्या जातात. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI हि टांकसाळ चालवते."
या बनावट नोटा भारतात चलनात आणण्यासाठी ISI दाऊद इब्राहिम , हवाला व इतर अंडरवर्ल्ड नेटवर्क चा वापर करते. पाकिस्तानी टांकसाळीत छापलेल्या या नोटा हुबेहूब भारतीय नोटांसारख्या असतात. दरवर्षी अंदाजे ७० कोटी मूल्याच्या बनावट नोटा बाजारात आणल्या जातात असा अंदाज आहे.
" ५०० - १००० च्या नोटा चलनातून बंद केल्याने पाकिस्तानातील नकली नोटांचा कारभार करणारे काही जनरल हृदयविकाराच्या झटक्याने नक्कीच मरतील. दाऊद ला तर मोदींनी बसल्या बसल्या कंगाल केले आहे " - तारिक फतेह, बलुची नेते.
विधानसभा निवडणुकीत भ्रष्ट नेत्यांची पंचाईत
गल्ली पासून दिल्ली पर्यंत होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत (सन्माननीय अपवाद वगळता) अर्थकारण किती महत्वाचे आहे हे उघड गुपित आहे. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे व रोख रक्कमेचे व्यवहार राजरोस पणे होताना या काळात दिसून येतात. या सर्व व्यवहारात बहुतांशी ५०० - १००० च्या नोटांचा वापर केला जातो. नोटांमधून सत्ता व सत्तेतून नोटा या दृष्टचक्रव्यूहास भेदण्याचे काम रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने केलेले आहे. उत्तर प्रदेशाच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा मास्टर स्ट्रोक भल्या भल्यांना काळजीत टाकून गेला. तर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करीत मोदींना समर्थन दिले.
"आम्ही काळया पैश्या च्या विरोधात आहोत" - मुलायमसिंग यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष.
काळ्या पैशास लगाम
मोदी सरकार च्या या आकस्मिक बदलामुळे काळ्या पैशास एक प्रकारे लगाम बसेल. सरकार दरबारी कर न भरता अवैध मार्गाने मिळवलेला पैसा दडवण्याचे साधन म्हणजे ५०० - १००० च्या नोटा होत्या. त्याच सरकार ने रद्दबादल ठरवल्याने अनेकांना हा बेहिशोबी पैश्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उद्भवलेल्या दिसतो. अनेकांनी या बेहिशोबी नोटा फाडून टाकल्या तर कुणी जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर अनेकांनी या नोटांची खैरात वाटल्याच्या बातम्या येत आहेत.
" धर्मदाय विश्वस्त किंवा मंदिरांना दान देणाऱ्यांना कदापि पाठीशी घालण्यात येणार नाही" - अरुण जेटली, अर्थमंत्री
" धर्मदाय विश्वस्त किंवा मंदिरांना दान देणाऱ्यांना कदापि पाठीशी घालण्यात येणार नाही" - अरुण जेटली, अर्थमंत्री
सामान्य जनते वर परिणाम -
सरकारच्या या आकस्मिक निर्णयामुळे जनता आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते. ५०० - १००० च्या नोटा अचानक रद्द झाल्याने बाजारपेठा ठप्प झाल्याचे दिसून येते तर बँक, कॅश डिपॉसिट मशीन व पोस्टाबाहेर लोकांच्या लांब रांगा दिसून येतात. पण या निर्णयाबाबत जनसामान्यांमध्ये समाधान दिसून येते.
.
अक्षय प्रकाश नेवे,
सहाय्यक प्राध्यापक,
इतिहास विभाग,
सर परशुरामभाऊ महाविद्यालय,
पुणे ३०.
सरकारच्या या आकस्मिक निर्णयामुळे जनता आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते. ५०० - १००० च्या नोटा अचानक रद्द झाल्याने बाजारपेठा ठप्प झाल्याचे दिसून येते तर बँक, कॅश डिपॉसिट मशीन व पोस्टाबाहेर लोकांच्या लांब रांगा दिसून येतात. पण या निर्णयाबाबत जनसामान्यांमध्ये समाधान दिसून येते.
.
अक्षय प्रकाश नेवे,
सहाय्यक प्राध्यापक,
इतिहास विभाग,
सर परशुरामभाऊ महाविद्यालय,
पुणे ३०.
Truly !! Great updated version of Surgical Strike !
ReplyDeleteInformative Blog...✌👍👌👌