Posts

Showing posts from 2020
Image
                     स्टोरीज फ्रॉम बिहार ।। दुसरी कथा।। मुनिया लेखक - अक्षय प्रकाश नेवे, ==================================     रविवारचा दिवस हा एसपी साहेबांचा खास कुटुंबासाठी राखीव असलेला दिवस होता. कर्तव्याएवढंच कुटुंब देखील महत्वाचं आहे असं त्यांचं वैक्तिक मत होते! त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगून ठेवले होते की काही अत्यावश्यक काम असेल तरच त्यांना फोन करावा नाहीतर ते काम आपण सोमवारी बघू! ..         तो रविवारचा दिवस होता एसपी साहेब आपल्या पूर्ण कुटुंबासोबत कोणतासा चित्रपट पाहण्याकरिता म्हणून नजीकच्या चित्रपटगृहात गेले होते, मध्यंतरा दरम्यान मोबाईल चेक करत असताना डिएसपी चे चार कॉल आल्याचं त्यांनी बघितलं आणि लगेचच रिटर्न कॉल केला. व त्यांनी मिसेस ला सांगितले की काही आवश्यक काम निघालाय मी निघतोय तू चित्रपट संपला की आई बाबा आणि मुलांना घेऊन घरी जा, मी ड्रायव्हर ला पाठवून देतो! ...    सायरनचा आवाज करीत पोलिसांची गाडी दानापूरच्या त्या वस्तीमध्ये शिरली व...
Image
स्टोरीज फ्रॉम बिहार ।।पहिली कथा।। मंटू  लेखक - अक्षय प्रकाश नेवे. ================================            त्या दिवशी मोठे साहेब भल्या पहाटे आपल्या पूर्ण लावाजम्या सह संपूर्ण जिल्ह्याभरात छापामारी करायला निघाले. गेल्या अनेक दिवसांपासून बालमजुरी चे वाढलेले प्रमाण त्यांना बेचैन करत होते. केंद्राकडून आलेले रिपोर्ट्स आणि स्थानिक वृत्तपत्रांनी बालमजुरीच्या उघडलेली मोहीम यांमुळे पूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले होते! जवळजवळ पाच ते सहा तालुक्यांमध्ये छापेमारी करून साहेबांनी जवळ जवळ तेरा ते चौदा मुलांना वेगवेगळ्या ठिकाणून सोडवून आणले, ह्या मुलांना राबवून घेणारे देखील त्यांच्या सोबतच होते! सर्वप्रथम तर साहेबांनी त्या मुलांना पलीकडच्या खोलीमध्ये नेऊन आपल्या स्टाफ ला त्यांच्या देखरेखीचे आदेश दिले आणि पोटभर जेवण व त्यांना आवश्यक वस्तू मागवून घेतल्या! नंतर साहेबांनी मोर्चा त्या माणसांकडे वळवला ज्यांच्या तावडीतून ह्या मुलांना सोडवून आणले होते. सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व योग्य ती शिक्षेची तरतूद होईल अश्या केसेस त्यांच्यावर दाखल करण्यात आल्या. ... ...