
स्टोरीज फ्रॉम बिहार ।। दुसरी कथा।। मुनिया लेखक - अक्षय प्रकाश नेवे, ================================== रविवारचा दिवस हा एसपी साहेबांचा खास कुटुंबासाठी राखीव असलेला दिवस होता. कर्तव्याएवढंच कुटुंब देखील महत्वाचं आहे असं त्यांचं वैक्तिक मत होते! त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगून ठेवले होते की काही अत्यावश्यक काम असेल तरच त्यांना फोन करावा नाहीतर ते काम आपण सोमवारी बघू! .. तो रविवारचा दिवस होता एसपी साहेब आपल्या पूर्ण कुटुंबासोबत कोणतासा चित्रपट पाहण्याकरिता म्हणून नजीकच्या चित्रपटगृहात गेले होते, मध्यंतरा दरम्यान मोबाईल चेक करत असताना डिएसपी चे चार कॉल आल्याचं त्यांनी बघितलं आणि लगेचच रिटर्न कॉल केला. व त्यांनी मिसेस ला सांगितले की काही आवश्यक काम निघालाय मी निघतोय तू चित्रपट संपला की आई बाबा आणि मुलांना घेऊन घरी जा, मी ड्रायव्हर ला पाठवून देतो! ... सायरनचा आवाज करीत पोलिसांची गाडी दानापूरच्या त्या वस्तीमध्ये शिरली व...