प्रवास
#स्टोरीज फ्रॉम बिहार ।।तिसरी कथा।। प्रवास लेखक - अक्षय प्रकाश नेवे .... डिसेंबरचा अखेरचा आठवडा असेल, कौशिक आणि त्याचे कुटुंब झारखंड मधील देवघरच्या बाबाधाम म्हणजेच वैज्यनाथ महादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते! महाराष्ट्रातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड होत बंगालच्या आसनसोलला जाणारी ती रेल्वे होती! धुक्यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकाचे बारा वाजले होते, अखेर सायंकाळी केव्हातरी ती ट्रेन जबलपूर स्टेशन मध्ये शिरली व धावतपळत जाऊन कौशिक व त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या रिजर्व सीट वर पोहोचत सुटकेचा निश्वास सोडला! एस ९ बोगीत त्यांची सहा सीट्स रिजर्व होती! "साधारणपणे १५ - १६ तासात ट्रेन जसीडीह स्टेशन ला पोहोचणे अपेक्षित आहे, तेथून बाबाधाम फक्त ३० मिनिटे , तो पर्यंत आराम करा!" कौशिकचे बाबा बोलले, आणि थोडे गप्पा टप्पा करीत ते पूर्ण कुटुंब निद्रादेवीच्या अधीन झाले. पहाटे केव्हा तरी लोकांच्या आवाजाने कौशिकचे झोपमोड झाली, ट्रेन बक्सर स्टेशन वर लागली होती. आरक्षित बोगी स्थानिक प्रवाश्यांनी भरून गेली, काही तरुण उद्धटपणे अगोदर बसलेल्या किंवा झोपलेल्या प्रवाश्यांवर रुबाब झाडीत त्यांची स...