...तो...
‘तो’
..आणि त्याच्या
अपयशाचे प्रतिक असलेले ते ‘नापास’ चे प्रमाणपत्र तो घराकडे निघाला. डोळ्यात अश्रू,
घरी काय तोंड दाखवायचे? या विवंचनेत असलेले मन , भूतकाळाचा सारीपाठ आठवत स्वत:स
दोष देत संताप व्यक्त करणारा मेंदू आणि त्यात उद्भवलेले नको नको त्या विचारांचे ओझे
घेऊन तो घराची वाटे ने निघाला.वरकरणी शांत पण आतून उध्वस्त होऊन दिशाहीन
गलबताप्रमाणे तो एकएक पाउल संथपणे टाकीत गल्लीत येऊन पोहोचला. घरामध्ये शिरताच
त्याने सरळ माजघर गाठले. घरातील सर्व साशंक नजरेने त्याच्या कडे पाहत होते. आणि..
सातत्याने प्रयत्न करून देखील अपयश त्याची पाठ सोडीत नव्हते. सागेसोयाऱ्यानी देखील वाया गेलेलं पोर म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आणि तो देखील स्वत:स तसेच समजायला लागला. गरुडझेपेची स्वप्न पाहणारा तो’ कोंबड्या साठी टाकलेले दाणे टिपू लागला. उध्वस्त झालेल्या मुलाकडे बघून कळवळणरा माय-बापांचा जीव तीळ तीळ तुटत होता आणि त्यांनी घेतला एक निर्णय पुन्हा एकदा त्याला संधी देण्याचा, आणि...
तो उध्वस्त राख झालेला पुन्हा फिनिक्स पक्ष्याच्या ओढीने एका नव्या शहरात आला.सर्वेच नवे , नवे गाव, नवे नाव, त्याच्या मनातला नवा भाव, असा नवा भिडू नवा राज्य करीत तो जून विसरून नव्याने संघर्षास तयार झाला. सतत अपयश देणारी परीक्षा रडत पडत त्याने एकदाची पास केली आणि घेतला एक धाडसी निर्णय, मर्यादित यश देणार क्षेत्र सोडून अमर्याद यश देणाऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा. पर्वती चढताना चारवेळा पडून जखमी झालेला ‘तो’ आता तोरणा पादाक्रांत करायला निघाला होता. आणि तो तेथून हि पडला तर.....?
..’तो’ पडणार , जास्तीत जास्त पायथ्यापर्यंत जाईल आणि येईल परत, नाका पेक्षा मोती जड व्हायचा, पेलवणार आहे का?, झेपणार नाही हो त्याला! असे अनेकांच्या तर्कांना तिलांजली देत त्याने तोरणा सर केला अन ते ही ण पडता , ण धडपडता! चकित होऊन सगळ्यांनी गृहीत धरले कि आता बस. जास्तीत जास्त हरीश्चंद्रगड .. त्याच्या पुढे कसला जातोय.. पण त्याच्या मनात काही तरी वेगळेच होते..
त्याने पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला. अत्यंत धक्कादायक .. पर्वती चढताना चार वेळा धडपडणारा ‘तो’ आता माउंट एवरेस्ट सर करण्याची स्वप्ने रंगवू लागला. गरुडझेप घेण्यासाठी जगातील सर्वोच्च ठिकाण त्याला साद घालू लागले. कठीण वाटचाल, अवघड रस्ते, प्रतिकूल परिस्थिती पण ‘तो’ आता पर्वती हून धडपडणारा तो राहिला नव्हता. माय-बाप गोंधळले होते, मात्र त्यांचा आपल्या मुलावर विश्वास होता. लढणाऱ्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत माय बापांनी फक्त लढ म्हटले. आणि...
.. आणि त्याने तयारीस सुरुवात केली.धोका पत्करला. पुन्हा एकदा सेटलमेंट सोडून अस्थिरते कडे पण ह्यावेळेस स्वत:च्या निर्णयाने . एवरेस्ट सर करताना ‘तो’ थकणार आहे! दमणार आहे! अक्षरश: तो रडकुंडीला येणार आहे! पण परतीचे दोर त्याने आधीच कापलेत. त्याला फक्त समोर चा मार्ग आहे. परतीचा प्रवास .. नामंजूर! नभाला गवसणी घालणाऱ्या त्या एवरेस्ट वर त्याला त्याचा ध्वज रोवायचाय. जो कोणी विचार हि आता पर्यंत कोणी केला नव्हता. तो विचार त्याला प्रत्यक्षात आणायचाय आणि त्यासाठी माय- बापावर जीव ओवाळीत ‘तो’ उभा ठाकलाय .. खेळ मांडायला!

“ओवाळूनी उधळतो, जीव माय-बापा...
वणवा ह्यो उरी पेटला..खेळ मांडला...!”
प्रा.
अक्षय प्रकाश नेवे,पुणे.
Nice...i like it... keep it up bro
ReplyDeleteVery nice Sir..
ReplyDeleteWe proud of you..
Very nice Sir..
ReplyDeleteWe proud of you..